साधा श्वास हीदेखील चैनीची बाब असलेल्या सियाचिनसारख्या जगातल्या सर्वांत उंच युद्धभूमीवर प्राणाची बाजी लावत तैनात असलेल्या हजारो जवानांना आता पुणेकर ‘ऑक्सिजन’ देणार आहेत. दर वर्षी २० हजार जवानांना पुरेल इतका ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणाच पुणेकरांनी सियाचिन येथे उभारली आहे. त्यामुळे निसर्ग हाच मोठा शत्रू असलेल्या या अतिदुर्गम भागात केवळ ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे जवानांचे मृत्यू टळू शकतील.